जळगाव : दोन दिवसांत रेल्वे प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केल्यानंतर, बुधवारी मनपा आरोग्य विभागाने बोगद्यातील गाळ काढल्याने बोगद्यातुन वाहतुक सुरु झाली आहे. बोगद्यातुन सुमारे पाच टन गाळ निघाला असून, संपूर्ण बोगद्या चकाचक झाला आहे. या नविन बोगद्यामुळे जुन्या बोगद्यातुन ये-जा करण्याचा नागरिकांचा त्रास वाचला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या बोगद्याचे काम पूर्ण होऊनही, पहिल्याच पावसात बोगद्यात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्यामुळे दोन महिन्यांपासून वाहतूक बंद होती. अखेर दोन महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाला बोगद्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन भूमीगत गटार करण्याचा उपाय सूचल्यानंतर दोन दिवसांत रेल्वे अधिकाऱ्यांनी गटारीचे काम पूर्ण केले आहे. मंगळवारी दुपारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर, तासाभरातच बोगद्यातील पाण्याचा निचरा झाला होता.पाण्याचा निचरा झाल्यानंतर, बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. एक ते दीड फुटापर्यंत गाळाचा थर साचलेला होता. पाण्याचा निचरा झाला असली तरी, या ठिकाणाहून वाहन काढणे अशक्य होते. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी सकाळी सातवाजता दहा ते बारा सफाई कर्मचाºयांना सोबत घेऊन, गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली. दुपारी बारापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने ५ टन गाळ उचलण्यात आला. त्यानंतर अग्निशामकचे दोन बंब आणून, संपूर्ण बोगदा धुण्यात आला. तसेच बोगद्याच्या आजूबाजूची मातीही उचलण्यात आल्याने, वाहतूकीसाठी संपूर्ण बोगदा खुला झाला.
जळगावात नवीन बजरंग बोगद्यातून वाहतुकीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 7:46 PM
दोन दिवसांत रेल्वे प्रशासनाने गटारीचे काम पूर्ण केल्यानंतर, बुधवारी मनपा आरोग्य विभागाने बोगद्यातील गाळ काढल्याने बोगद्यातुन वाहतुक सुरु झाली आहे.
ठळक मुद्देपाच टन काढला गाळजळगावकरांमध्ये समाधानबोगद्यात पाणी साचल्यामुळे झाले होते हाल