जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. विद्यापीठाच्या पासधारक विद्याथ्र्यासाठीच असणा:या या बससेवेचे उदघाटन गुरुवारी सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना विद्यापीठात जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने रिक्षांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ ने विद्याथ्र्याचे होत असलेले हाल याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशीत केले होते. तसेच कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सुरु केलेल्या ‘विद्यार्थी-कुलगुरु संवाद पर्व’ मध्ये देखील अनेक विद्याथ्र्यानी कुलगुरुंना बससेवा सुरु करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार कुलगुरुंनी एसटीच्या विभाग नियंत्रकांशी चर्चा करून ही बससेवा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. बससेवा सुरु होत असल्याने विद्याथ्र्याचे होणारे हाल थांबणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 200 विद्याथ्र्यासाठी चार बस प्रायोगिक तत्वावर सुरु केल्या जाणार आहेत. एका बसमध्ये 50 पासधारक विद्यार्थी राहतील. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत पहिली बस जुन्या बसस्थानकापासून विद्यापीठाकडे रवाना होणार आहे. या पहिल्या बसने कुलगुरु विद्यापीठार्पयत प्रवास करणार आहेत. मंगळवारी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कुलगुरुंनी विद्याथ्र्याशी संवाद साधून प्रायोगिक तत्वावर ही बससेवा विद्याथ्र्याच्या सोयीसाठी सुरु करण्यात येत असून विद्याथ्र्यानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.पासधारक विद्याथ्र्यासाठीच सुविधा सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात बससेवेचे उदघाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 8.30 वाजता ते 9.30 वाजेदरम्यान चार विशेष बस विद्याथ्र्यासाठी सुरु केल्या जात आहेत. परतीसाठी देखील संध्याकाळी 4.30 ते 5.30 दरम्यान चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्याथ्र्यासाठी दरमहा 260 रुपये असे शुल्क पाससाठी आकारण्यात येणार आहे. पहिल्या महिन्यात 300 रुपये आकारले जाणार आहेत. या बसमध्ये केवळ पासधारक विद्याथ्र्यानाच बसता येईल.
आजपासून विद्यापीठ बससेवेला सुरुवात
By admin | Published: January 12, 2017 12:25 AM