आॅनलाईन लोकमतजळगाव दि. ५ : समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळा आणि महाराष्ट्र शासन, साहित्य व संस्कृती विभाग यांच्यातर्फे राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन जळगाव येथे १० डिसेंबर रोजी होत आहे.या साहित्य संमेलनासाठी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात लिखाण करणारे साहित्यिक लेखक आणि वर्तमान पत्रातून लिखाण करणारे पत्रकार, स्तंभलेखक, संशोधन क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावरील लिखाणाला चालना मिळावी आणि या विषयावरील लेखन प्रभावीपणे समाजासमोर यावेत, हा उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे. या अनुषंगाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रकट मुलाखत, महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, त्याचप्रमाणे संशोधन पद्धती, स्तंभलेखन पेपर लिखाण, ललित लेखन अशा विविध गटात चर्चेचे नियोजन करण्यात येईल. पर्यावरण आणि निसर्ग साहित्यातून रचनात्मक जनआंदोलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.साहित्य संमेलनाच्या प्रारंभी पर्यावरण साहित्याच्या ‘ग्रंथदिंडीचे’ आयोजनही करण्यात येणार आहे. अधिकाधिक शाळा, महाविद्यालयांनी आणि संस्था संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.
जळगावात डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 7:31 PM
जळगाव दि. ५ : समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळा आणि महाराष्ट्र शासन, साहित्य व संस्कृती विभाग यांच्यातर्फे राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन जळगाव येथे १० डिसेंबर रोजी होत आहे.
ठळक मुद्देपर्यावरण आणि निसर्ग साहित्यातून जनआंदोलन या विषयावर परिसंवादपर्यावरण साहित्याच्या ‘ग्रंथदिंडीचे’ आयोजनपर्यावरण साहित्य संमेलन जळगाव येथे १० डिसेंबर रोजी