आॅनलाइन लोकमतरावेर, जि. जळगाव, दि. २१ - जळगावहून बिहार राज्यातील पटणा येथे सीपीव्हीसी फिटींग फुलराऊंड व्हॉल्व्हने भरलेला मिनीट्रक (एम पी - १३ /जी ए ७०३९) शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उलटला. यामुळे बºहाणपूर - अंकलेश्वर राज्यमहामार्गावरील दुतर्फा वाहतूकीची रहदारी झालीे. दरम्यान, ट्रकमधील सीपीव्हीसी फिटींग फुलराऊंड व्हॉल्व्हने भरलेले सव्वा दोन कोटी रू किमतीचे १४७० बॉक्स (प्रत्येकी किंमत १५ हजार ३०० रू) मजुरांकरवी खाली करण्यात आले.सावदा शहरात थांबा घेऊन मद्यप्राशन केलेल्या चालक व क्लिनरच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, रस्त्यावरील अज्ञात वाहनचालकाच्या खबरीवरून मध्यप्रदेश पोलिसांचे गस्तीवरील वाहन महाराष्ट्र वा मध्यप्रदेश अशी कोणतीही हद्द न पाहता मानवता दृष्टीने घटनास्थळी तत्क्षणी दाखल होवून जखमी चालक व वाहकाला घेऊन बºहाणपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. दरम्यान, रावेर पो स्टे चे फौजदार ढोमणे व पो कॉ नीलेश चौधरी यांनी वाहन रस्त्याचे बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिल्याने तब्बल दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.
ब-हाणपूर - अंकलेश्वर राज्यमहामार्गावर ट्रक उलटून वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:48 PM