जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षा १३ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील १० केंद्रांवर होणार आहे. इयत्ता दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असून, दोन हजार ४७७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
प्रत्येकी शंभर गुणांचे दोन पेपर होणार
राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जिल्ह्यातून दोन हजार ४७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ही परीक्षा रविवारी होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी या दोन विषयांवर प्रत्येकी शंभर गुणांवर पेपर होईल. बौद्धिक क्षमता चाचणी पेपर हा सकाळी १०.३० ते १२.३० या कालावधीत होईल व शालेय क्षमता चाचणी पेपर हा दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत होईल.
या केंद्रांवर होईल परीक्षा
ही राज्यस्तरीय परीक्षा जिल्ह्यातील १० केंद्रांवर होईल. त्यात इंदिरा ललवाणी स्कूल (जामनेरपुरा), के. नारखेडे स्कूल, भुसावळ हायस्कूल (भुसावळ), प.न. लुंकड कन्या शाळा, शेठ एल.एन. सार्वजनिक विद्यालय (जळगाव), जी.एस. हायस्कूल (पाचोरा), ए.बी. बॉय स्कूल (चाळीसगाव), म्युन्सिपल हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (फैजपूर), पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल (चोपडा), आर.टी. काबरे विद्यालय (एरंडोल) या केंद्रांचा समावेश आहे.