अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रतापिय’ हे ७४व्या नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच झाले.नियतकालिकाच्या मुखपृष्ठाची संकल्पना खान्देशी संस्कृतीची असून, खान्देशच्या इतिहासाची सुसंगतपणे मांडणी केलेली आहे. प्रतापिय अंकात नावीण्यता आणण्याच्या दृष्टीने अंकाच्या मुख्य संपादिका प्रा.डॉ.शैलेजा महेश्वरी, कार्यकारी संपादक प्रा.डॉ.डी.एन. वाघ यांच्यासह सर्व संपादक मंडळाने प्रयत्न केले. शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ चा प्रतापिय अंक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धेसाठी सादर करण्यात आला आहे.या अंकाचे प्रकाशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कार्याउपाध्यक्ष संदेश गुजराथी, संचालक नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, हरी वाणी, उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, चिटणीस प्रा.डॉ.एस.बी.जैन, प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जे.एस. राणे, सुरेश माहेश्वरी आदींच्या हस्ते झाले.प्रकाशनप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एल.एल.मोमाया,सहसंपादक प्रा.नितीन पाटील, सहसंपादक प्रा.डॉ.रमेश माने यांच्यासह भटू चौधरी व योगेश चौधरी उपस्थित होते.