जळगाव- शासनाचा २०१७-१८ चा राज्य शिक्षक पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे़ यात जळगाव जिल्ह्यातील ३ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांना बुधवार, ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे़२०१७-१८ च्या पुरस्कारासाठी राज्यासह जिल्ह्याभरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची यादी पाठविण्यात आली होती़ अंतिम निवड यादी तयार करण्यासाठी जुलै महिन्यात समिती नियुक्ती केली होती़ अखेर मंगळवारी राज्यभरातील राज्य शिक्षक पुरस्काराच्या मानकरी असलेले शिक्षकांची यादी जाहिर झाली़ यात जळगाव जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा पुरस्कार जाहिर झालेला आहे़ त्यात प्राथमिक शिक्षक विभागातून पारोळा तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मनवंतराव भिमराव साळुंखे यांना तर माध्यमिक शिक्षक विभागातून पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक डॉ़ ईश्वर शेखनाथ पाटील तर आदिवासी प्राथमिक शिक्षक विभागातून रावेर तालुक्यातील मोरव्हाल जिल्हा परिषद शाळेचे साहेबु मयबु तडवी यांचा समावेश आहे़
जळगाव जिल्ह्यातील ३ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 8:01 PM
शासनाचा २०१७-१८ चा राज्य शिक्षक पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे़ यात जळगाव जिल्ह्यातील ३ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांना बुधवार, ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे़
ठळक मुद्दे५ सप्टेंबरला होणार पुरस्काराने सन्मानितजिल्हाभरातील तीन शिक्षकांचा समावेश