चोपडा, जि.जळगाव : नागरिकता संशोधन विधेयक हे धर्मावर आधारित असल्याने ते घटनेविरोधी आहे म्हणून ते रद्द करण्यात यावे यासाठी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.मुस्लीम बांधवांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाचा निषेध करीत असून, सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानाच्या अनुच्छेद १४च्या विरोधात आहे. यामुळे देशातील एकते व अखंडतेला धोका निर्मान होऊ शकतो. तरी हा कायदा रद्द करावा.यावेळी उपनगराध्यक्ष हुसेनखा पठान, हनीफ शेख, जाकीर हुसेन, मुख्तार सरदार, अहसान शेठ, रशीद अरब, अरमानअली, तय्यब बागवान, आरीफ सिद्दीक, नोमान काजी, आसिफ सय्यद, अकील जहागीरदार, भुऱ्या शेख, आरीफ शेख अजीज, रियाज बागवान, यूसुफ अली, शेखर पाटील, शकील शेख, जाकीर शेख, मोहसीन भांजा आदी उपस्थित होते.
नागरिकत्व विधेयकाविरोधात चोपडा येथे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 9:38 PM