मेहमुदूर रहमान कमिटीच्या अहवालात मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये तत्काळ १० टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण व संशोधन संस्था बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था सुरू करण्यात यावी, जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज वसतिगृहांची उभारणी करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी नगरसेवक अय्युब बागवान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमजद पठान, नगरसेवक हाजी रसूल शेख, हाजी नसीर बागवान, मुख्तार शाह, माजी सभापती इस्माइल शेख, हाजी एजाज बागवान, शिवसेनेचे अल्पसंख्याक शहर संघटक शाकीर बागवान, जारगाव ग्रामपंचायत सदस्य राजू शेख, डॉ. जाकीर देशमुख, मौलाना ज़ैद उमरी, शकील खान, सलीम शाह, हाजी मुजाहीद खाटीक, रउफ टकारी, वसीम बागवान, शरीफ खाटीक, इरफान मनियार, साजीद कुरैशी, आकीब शेख सर, जमील सौदागर, शकील पिंजारी, कैसर मिस्त्री व रईस बागवान उपस्थित होते.