शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

राहो आता हेचि ध्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:22 PM

राहो आता हेचि ध्यान।डोळा मन लंपट।। कोंडून कोंडून धरीन जीवे।देह भावे पूजिन।।     या अभंगामध्ये वर्णन केलेले भगवान ...

राहो आता हेचि ध्यान।डोळा मन लंपट।। कोंडून कोंडून धरीन जीवे।देह भावे पूजिन।।    या अभंगामध्ये वर्णन केलेले भगवान संत  तुकाराम महाराजांना दिसले. पण ते कसे दिसले ते हे ध्यान सुंदर आहे. त्यांच्या ठाई सर्व सुख आहे,  हे सर्वांना कळले पण आता सर्वांनी निश्चय करावा आणि तो म्हणजे राहो आता हेचि ध्यान.  त्या आधी साधक म्हणून जे वारकरी भक्ताचा निश्चय व्हायला पाहिजे...तो म्हणजे मी भक्ती साधना करीन. साधना कोणती आणि मी काय करतो,  जे करतो आहे ते बरोबर आहे का ?चूक आहे. असा मनात विचार करून निश्चयाने योग्य भक्ती साधना करावी. म्हणूनच माणसाने निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ।  तुकाराम महाराजांचा असा निर्धार होता. आजवर केलेली भक्ती साधना आणि त्यांचे मिळालेले फळ म्हणून विठ्ठलाचे दर्शन झाले. मूर्ती समोर नसतानाही हे त्यांनी अनुभवले. निश्चय झाला की आता हेच ध्यान माझ्यासह जगताच्या डोळ्या समोर पांडुरंगाचे ध्यान माझ्या हृदयात सतत राहो .....आता हेचि ध्यान. सध्या सर्वाचे ध्यान कोरोनाच्या प्रादुर्भावावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोना बाबत जनजागृती वैज्ञानिक व वैद्यकीय उपाय योजना,संशोधन हे शास्त्रज्ञ करीत आहे. त्यावर उपाय निघेल तेव्हा निघेलच.  पण सध्या भारतीय संस्कृतीचे आचरण हे नैसर्गिक आचरण आहे. ही  आपत्कालीन परिस्थिती देशावर आली  आहे. पुढचे युद्ध हे कठिण परिस्थितीचे आहे पण आज  सर्वजण हे हस्तांदोलन(शेक हँड) ही पध्दत कोरोना वाढीचे कारण ठरले आहे हे लक्षात आल्यावर देशाचे प्रमुख नेते एकमेकांना भेटल्यावर   हात जोडून नमस्कार करण्याची वारकरी संप्रदाय भारतीय पद्ध अवलंबली जात आहे. म्हणजे हस्तांदोलनाला आता राम राम।भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार राम राम करून जगभर भारतीय संस्कृतीला महत्त्वाचे स्थान देऊन जगातील प्रत्येक व्यक्ती नमस्काराच्या आधारे अभिवादन करीतआहेत. आता भारत देश महासत्ता बनण्याचे पहिले सांस्कृतिक चित्र दिसत आहे भारत भूमी ही देव ऋषी मुनी साधू संतांची आहे. प्रत्येकाचा हवा आहे निर्धार . तसा निर्धार तुकाराम महाराज दाखवत आहे        होईल येणे कळसा आले।स्थिरावले अंतरी।।        तुका म्हणे गोजिरीया। विठोबा पाया पडो दया ।।     तुकाराम महाराज म्हणतात गोजरिया म्हणजे  विठ्ठल परब्रम्ह।पांडुरंग त्या गोजिरीया चे दर्शन. पाया पडूदया आणि मला दर्शन घेऊ द्या असे महाराज जनतेला उपदेश करताना सांगत आहे ही संतांची शिकवण आचरणात आणून कोरोना सारख्या महामारीच्या आजाराला तोंड देण्यासाठी  घरातच काही दिवस थांबायचे आहे आणि कोरोनाला कायमचे हद्दपार करायचे आहे संकट समय जवळ आला आता घरात सद्गुरु संत महंत पांडुरंगाचे स्मरण करून देव देवतांच्या शक्तीने देश वाचवू आणि देह भावाने संत  आपल्या शासनाचे आदेश नियम कायद्याचे बंधन पालन करू. 

- अॕड. राधिका गोपाळ ढाके पोलीस पाटील भादली बुद्रूक.

टॅग्स :Jalgaonजळगाव