गोंडगाव ता. भडगाव : ट्रक आणि ट्रॅक्टर या वाहनांच्या माध्यमातून होणारी वाळूची चोरी जिल्ह्यासाठी नवीन नाही. गिरणा नदीतून शेकडो ब्रास वाळूची खुलेआम दररोज तस्करी होताना दिसून येत आहे. यामुळे गोंडगाव ते कजगाव रस्ता पूर्णत: खराब झाला असून वाहन चालविणे मोठे जिकरीचे झाले आहे. मोठया वाहनांना रस्त्यावर बंदी असली तरी वाळू तस्करांनी आता चक्क बैलगाड्यांच्या साहाय्याने रेती तस्करी सुरू केली आहे. ही रेती परजिल्हात जास्त भावाने विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे .जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वाळू चोरीचा गोरख धंदा सुरू आहे दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करून परजिल्ह्यात त्याची विक्री केली जाते. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी झालेली आहे आणि होत आहे. या तस्करीला आळा घालण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे, मात्र या विभागाने काही पथके तयार केली आहेत परंतू लहानसहान करवाई पालिकडे कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. अनेकांचे वाळू तस्करांशी हितसंबंध गुंतल्याचे दिसून येत आहे .महसूल प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही म्हणून काही गावातील नागरिकांनी आता स्वत:च याला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी त्यांची ताकद तोकडीच पडत आहे.गिरणा परिसरात आधीच दुष्काळ असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. गिरणा नदीच्या पात्रात वाळूचे उत्खनन जास्त प्रमाणात झाले तर पाणी थांबेल का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.चारशे रुपये एका बैलगाडीचेया परिसरात ४०० रुपये बैलगाडी प्रमाणे वाळूची विक्री होताना दिसून येत आहे. दिवसाला चार ते पाच खेपा एक बैलगाडीच्या होतात. म्हणजेच २००० रुपये एका बैलगाडी मालकाला मिळतात. या चोरीकडे मात्र तहसिल प्रशासनाचे चक्क दूर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगतात.
गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाड्यांद्वारे वाळू चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:02 AM
गोंडगाव परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून चोरट्यांकडून आता बैलगाड्या वापरून वाळूची चोरी केली जात असून महसूल प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे.
ठळक मुद्देवाळू वाहतूकपोटी एका बैलगाडी पडतात चारशे रुपये.वाळू वाहतुकीमुळे गोंडगाव कजगाव रस्ता खराब