ठळक मुद्दे७० हजार रुपयांचा ऐवज लंपासकुटुंबीय घरी नसताना चोरट्यांनी साधला डावरोख रकमेसोबतच ४५ हजारांचे दागिने होते
भुसावळ : येथील रेल्वेचे तिकीट निरीक्षक राजेंद्र शंकर देशपांडे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, गजानननगर) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. देशपांडे घरी नसताना चोरट्यांनी ही संधी साधली. देशपांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिकीट निरीक्षक देशपांडे हे रविवारी दुपारी दीड वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. २५ हजार रुपये रोख व ४५ हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.