अट्रावल, ता.यावल : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने रब्बीचे पीक जोमाने वाढ होत आहे शिवाय गहू, हरभरा या पिकांना थंडीचे वातावरण अनुकूल असल्याने या पिकांची वाढ थंडीमुळे झपाटय़ाने होत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे शेतक:यांमध्ये कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. एकीकडे रब्बीचा पिकांना थंडी ही पोषक आहे तर केळीला मात्र या थंडीमुळे मोठय़ा प्रमाणावर फटका बसत आहे. यामध्ये अट्रावल परिसरात केळी पीक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने या केळीला थंडीमुळे या केळीवर करप्याचे प्रमाण फार मोठय़ा झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे शेतकरीवर्गात मोठी चिंता व्यक्त होत आहे. या करपा निमरूलनासाठी कृषी विभागाकडून काही प्रमाणात औषधी पुरवण्यात आलेली आहे. याची फवारणी शेतकरी आपल्या केळी बागांवर करीत आहे.
कडाक्याच्या थंडीचा रब्बीला लाभ, केळीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:56 AM