अमळनेर : गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिशय अवघड अतिक्रमण हटवून प्रशासनाने मुख्य रस्ता मोकळा केला. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र उच्च न्यायालयाने आदेश देऊनही भागवत व कुंटे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याकडे अद्याप दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.शहरातील भागवत रस्त्यावरील अतिक्रमित टपऱ्या आहे तशाच आहेत. कुंटे रोडवरदेखील दुकानदारांनी रस्ता व्यापला आहे. बस स्थानकाच्या गेटसमोरील भागवत रस्त्यावर ४० ते ५० टपºया अतिक्रमित असल्याने तो रस्ता अर्धा व्यापला गेला आहे. तर हातगाडी चालक व अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने त्यात भर घालून पायी चालणाऱ्यांना देखील अडचणी निर्माण करतात. नगरपालिकेने नागरिकांची अडचण दूर करण्याऐवजी उच्च न्यायालयाचा आदेश न पाळता उलटपक्षी बसस्थानकासमोर बॅरिकेट्स लावून रस्ता अडविल्याचे दिसते. या भागातील वाहतूक बंद करून पालिकेने वाहतुकीची कोंडी थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी पयार्यी सुविधा केलेली नाही. पाचपावली समोरील रस्ता आणि सुभाष चौक ते कुंटे रोड येथे किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी रस्ते व्यापून टाकल्याने येथून वाहने नेणे अवघड जाते.सुभाष चौक ते कुंटे रोडवरील पक्के दुकानांचे शेड काढले पण दुसºया दिवसापासून हातगाड्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे कुंटे रोडची रुंदी जास्त असली तरी काही गॅरेज चालकांनी आपल्याच मालकीचा रस्ता समजून व्यवसाय सुरू केला आहे. दुरुस्तीची वाहने रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे पादचायांनाही त्रास होतो.शहरात दिवसेंदिवस रहदारीचे प्रमाण वाढत आहे. त्यात अवजड वाहनांमुळे स्थानिकांना रहदारीचा त्रास होतो. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून सगळीकडील अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.