आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२७- इकबाल कॉलनीत दुकानाच्या बाहेर उघड्यावर मांसविक्री करणाºया विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर दुकानमालक व त्याच्या मुलांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. तसेच मटन कापण्याचे सुरे काढून कर्मचाºयांना धमकावले. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच़एमख़ान यांनी दिली.
अक्सानगरातील इकबाल कॉलनीत पुलाजवळ काही मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. मात्र ते दुकानात मांस विक्री न करता दुकानाबाहेर गाडी लावून अथवा ओटे बांधून उघड्यावर मांसविक्री करतात. याबाबत नगरसेविका सुभद्रा नाईक व नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे यांनी मनपाकडे तक्रारही केली होती. त्यानुसार ८ दिवसांपूर्वी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करीत ओटे तोडले होते. मात्र त्यानंतर पुन्हा या विक्रेत्यांनी उघड्यावरच विक्री सुरू केल्याची तक्रार एका शिष्टमंडळाने मनपात येऊन केली होती. तसेच शुक्रवारी सकाळी नगरसेविका नाईक यांनी उघड्यावर मांस विक्री सुरू असल्याची तक्रार केली. त्यानुसार अतिक्रमण अधिक्षकांनी प्रभाग समिती क्र.३ चे प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे यांना याबाबत कळविले. त्यांनी त्यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाईसाठी पाठविले. कारवाई सुरू करून ३ काटे व लोटगाडी जप्त केली. त्यामुळे चिडलेल्या मांस विक्रेत्यांनी या पथकावर दगडफेक केली. तसेच सुरे काढून धमकावले.
या दगडफेकीत सैय्यद साजीदअली, सलमान भिस्ती व रेहानाबी हे तीन कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.