बोदवड : आमदारांचे निलंबन मागे घ्या व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी काँग्रेसतर्फे शुक्रवारी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोदवड येथील मलकापूर चौफुलीवर काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवाय अधिवेशनात १९ आमदाराचे नऊ महिन्यांसाठी केलेले निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.मलकापूर रस्ता चौफुलीवर सकाळी ११ वाजता काँग्रेसतर्फे अधिवेशनात १९ आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्याचा निषेध करण्यात आला. आमदारांचे निलंबन रद्द करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, वीज दरवाढ रद्द करा, बँकात पुरेशा रक्कमा उपलब्ध करा या घोषणांसह फडणवीस सरकार विरुद्ध घोषणा करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तब्बल अर्धा तास रास्ता रोको केला. यावेळी चारही बाजुच्या रस्त्यावरील वाहतूक अडवण्यात आली होती.मोर्चात वीरेंद्रसिंग पाटील, ईश्वर जंगले, भरत पाटील, दिलीपसिंग पाटील, आनंदा पाटील, अजय गवळे, परमेश्वर टिकारे, भागवत वंजारी, आधारसिंग पाटील, मेहबूब शे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
आमदाराचे निलंबन मागे घेण्यासाठी काँग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 6:27 PM