ठळक मुद्देदारू विक्रीने महिला त्रस्त दारू विक्री बंदसाठी फलकावर झळकला मजकूरखुलेआम दारू विक्रीने तरुण पिढीचे नुकसान जामनेर येथील गणेशवाडीत दारूविक्री बंदीसाठी लावण्यात आलेला फलक.
ऑनलाईन लोकमत जामनेर, जि. जळगाव, दि. 6 : राज्य मार्गापासून 500 मीटर्पयतची दारू दुकाने बंद झाल्यानंतरदेखील चोरटय़ा मार्गाने दारू विक्री केली जाते. जामनेर शहरातील गणेशवाडी भागात होत असलेल्या दारू विक्रीने समस्त महिला त्रस्त आहेत. दारू विक्री बंद व्हावी यासाठी फलकावर जाहीरपणे मजकूर लिहून जनजागृती करण्याचा असाही प्रयत्न करण्यात आला आहे. फलकावरील आशय असा : दारू विक्री करणे कायद्याने बंद असली तरी आपल्या गणेशवाडीत खुलेआम होत असलेल्या दारू विक्रीने तरुण पिढीचे नुकसान होत आहे. तरी या भागातील सर्व नागरिकांनी दारूबंदीसाठी सहकार्य करावे. विशेष म्हणजे या आशयाचे आवाहन करणारे मॅसेजेस रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.