जळगाव : के.जी. टू पी.जी. पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे..., विद्यार्थ्यांवरील गोळीबार, लाठीमार बंद करावा..., सर्वांना समान शिक्षण प्रधान करावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांतर्फे जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिक्षणाचे बाजारीकरणं थांबलचं पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचं..., नाही कुणाच्या बापाचं, शिक्षणाच्या बाजारीकरणावर हल्ला बोल, संघर्ष हमारा नारा है...भावी इतिहास हमारा है, अशा विद्यार्थ्यांच्या जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेले होते़
शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे जळगावात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:34 PM