लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा कायदा मागे घ्यावा, अन्यथा जिल्ह्यातील भाजप खासदार व मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
द्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याने त्यासंदर्भात निर्णय होत नाही. केंद्राने हा कायदा त्वरित मागे घेतला नाही तर जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार त्याचप्रमाणे मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलनासंदर्भात भूमिका मांडतांना आमदार अनिल पाटील यांनी दिला. दरम्यान, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले की नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकऱ्यांचे हित साधने ही केंद्राची जबाबदारी आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजीमंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवक महानगराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, डॉ. अभिषेक ठाकूर, ऍड. कुणाल पाटील, वाल्मिक पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.