शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पदाधिकाºयांसह ग्रामस्थांचे रास्ता रोको

By admin | Published: July 06, 2017 1:16 AM

फत्तेपूर : ग्रामपंचायतींच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याचा निषेध, ११ जणांना अटक व सुटका

फत्तेपूर, ता. जामनेर : वीज बिलाच्या थकबाकीपोटी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी येथील बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. यात सरपंचांसह ११ जणांना अटक करण्यात आली. आंदोलनामुळे एक तास बसमधील प्रवाशांचे हाल झाले.तोंडापूर धरणाहून फत्तेपूरसह परिसरातील १७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, वीज बिल थकले म्हणून गेल्या एक महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी १७ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.  दरम्यान, वास्तविक फत्तेपूर ग्रामपंचायतीने आजपावेतो २७ लाख रुपये वीज बिलाचा भरणा केलेला आहे. उर्वरित ग्रामपंचायती वीज बिलाची वेळोवेळी पूर्तता करीत नाहीत. त्यांच्यासोबत फत्तेपूरलासुद्धा वेठीस धरले जात आहे. तोंडापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी फत्तेपूर ग्रामपंचायतीने विनंती करूनही वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. परिणामी ५ रोजी सकाळी १० वाजता सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले.  एक तास रास्ता रोको सुरू होता. या वेळी बसेस पुढे जाऊ शकल्या नाही. परिणामी प्रवासीवर्गाची तारांबळ उडाली.गटविकास अधिकाºयांचे आश्वासनदरम्यान, गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे  ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. या वेळी गटविकास अधिकाºयांनी पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.  आंदोलनाची फलश्रुती म्हणून तोंडापूर धरणातून सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने फत्तेपूरवासीयांनी समाधान व्यक्त केले.