ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.13 - औद्योगिक वसाहतमधील दालमिल्समधून दाळच्या होणा:या चो:या, कंपन्यांच्या बाहेर उभ्या ट्रकचा अडथळा, पानटप:यांवर दारुची विक्री तसेच आणि पथदिवे बंद यासारख्या अनेक समस्या व तक्रारींचा पाढा उद्योजकांनी पोलिसांसमोर वाचला. या सा:या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा:यांनी अधूनमधून प्रत्येक कंपनीत भेट द्यावी तसेच एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशा मागण्या उद्योजकांनी पोलीस-उद्योजक समन्वय बैठकीत केल्या.
औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत सोमवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या प्रमुख उपस्थित उद्योजकांनी पोलीस-उद्योजक समन्वय बैठक झाली. यावेळी उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, ‘जिंदा’चे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग यांच्यासह प्लास्टीक, चटई, दालमील व केमिकल्स उद्योजक उपस्थित होते.
स्वतंत्र पोलीस स्टेशन हवे
औद्योगिक वसाहतीत लहान मोठे 1200 उद्योग आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या उद्योगांसह ग्रामीण व शहरी भाग आहे. 50 टक्के भाग झोपडपट्टी व त्यात सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यात अपु:या मनुष्यबळामुळे पोलिसांची कसरत होते. या सा:या अडचणींमुळे पोलिसांना औद्योगिक वसाहतीत पुरेसा वेळ देता येत नाही, त्याचाच फायदा भुरटे चोरटे, टप:यांवर दारु विक्री करणारे व कंपन्यांमधील चोरटे घेतात. या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशी मागणी ‘जिंदा’चे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग यांनी केली. त्यांच्या या मागणीला उद्योजकांनी समर्थन दिले.
सुप्रीम कॉलनीत आढळते दाळ
दालमील मधून दाळ चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुप्रीम कॉलनीतील काही कामगार दालमिल्समध्ये काम करतात. चोरी झाल्यानंतर सुप्रीम कॉलनीत ठिकठिकाणी दाळ सुकविण्यासाठी बाहेर टाकलेली दिसून येते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी ब्रोकरच्या माध्यमातून दाळ विक्री होत असल्याने फसवणुकीचे प्रकार होत आहेत. त्याचा कोणताच पुरावा राहत नसल्याने गुन्हा दाखल करताना अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रदीप अग्रवाल, राजेश अग्रवाल, रमन जाजू, विनोद बियाणी, धीरज राठी यांनीही सूचना मांडल्या.