पारोळा : भारिप बहुजन आघाडीतर्फे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयय महामार्गावर २० मिनिटे रास्ता रोको करून तहसीलदार ए.झेड.वंजारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपजिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे, जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, तालुकाध्यक्ष गौतम पवार, उपाध्यक्ष समाधान कोळी, तालुका महासचिव अकिल शेख, युवाध्यक्ष योगेश महाले, कार्याध्यक्ष देविदास पवार, शहर अध्यक्ष कमलेश सोनवणे, तालुका महिला अध्यक्ष मायाताई सरदार, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतक?्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी, वीज बिल माफ करावे, तालुक्याचा विकास साधण्यासाठी पारोळा हे स्वतंत्र विधानसभा क्षेत्र करण्यात यावे, रमाई व शबरी घरकुल योजनांचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, घरकुलाची रक्कम तीन लाखांपर्यंत करावी, बिरसा मुंडा कृषी योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजनांचे वितरण ड्रॉ पद्धतीने करून त्यांचे लक्षांक वाढवून मिळावे, सर्व महामंडळांना तत्काळ निधी दिला या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.