पारोळा : दररोज पारोळा येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिंनींना एस.टी. बसच्या प्रवासात विविध अडचणींमुळे सोसाव्या लागणाºया त्रासामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे येथे काही वेळ बस वाहतूक ठप्प पडली होती.तालुक्यातील शिरसमणी येथे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पारोळा येथे कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांनी एस.टी. बसेस अडवून रास्ता रोको केला. विद्यार्थ्यांना सतत अपडाऊन करताना होणाºया त्रासाला कंटाळून त्यांनी बसेस थांबवून परिवहन मंडळाचा निषेध केला. कॉलेज व शाळेची वेळ ११ वाजेची असून वेळेवर कधीच बस येत नाही. कधी कधी तर या फेºया सुद्धा बंद असतात. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. व अनेकवेळा लेखी तोंडीं तक्रारी देऊन सुध्दा दखल घेतली जात नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. दरम्यान, सोमवारी याच बसमधून शिरसमणी येथील दोन विद्यार्थी बसचा दरवाजा अचानक उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले असून ते दवाखान्यात अॅडमिट आहेत. या घटनेला चालक व वाहक जबाबदार असल्याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शिरसमणी येथून येणाºया विद्यार्थ्यांना जादा बस सोडण्याबाबत अमळनेरचे नियंत्रक अर्चना भदाणे यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज पुन्हा बस वेळेवर आली नाही व जादा बसही सोडली नाही, म्हणून उशिरा आलेली बस जाऊ देणारं नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला त्यामुळे बराच वेळ दोन बसेस शिरसमणी येथे थांबून होत्या. गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन, चेतन पाटील, रोहीदास पाटील, हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजुत घातली व पोलिसासमोर उद्यापासून बसेसची फेरी वाढवून नियमित व वेळेवर बस पाठवू असे आश्वासन एस.टी. कर्मचारी यांनी दिले.
शिरसमणी येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 1:18 AM
शिक्षणासाठी जाताना दररोज बसमधून प्रवास करावा लागत असतो. परंतु पुरेशा आणि वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनींचे हाल होत असतात यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे रास्ता रोको करून बसेस अडविल्या.
ठळक मुद्देगावकºयांनी व एस.टी. कर्मचाºयांनी काढली विद्यार्थ्यांची समजूतबसमधून दोन विद्यार्थी पडल्याने संतापात पडली होती भर