जळगाव: ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. याचवेळी जि.प.जवळील चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.मोर्चाची सुरवात दुपारी बळीराम पेठेतील लालबावटा कार्यालयापासून करण्यात आली. यानंतर सुमारे १५ मिनिटे जिल्हा परिषदेजवळील पत्र्याहनुमान मंदिर चौकात रास्तारोको करण्यात आला.रास्तारोको दरम्यान शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आॅनलाईन पगाराबाबत जि. प. कडून होत असलेल्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.हा मोर्चा महासंघाचे अध्यक्ष अमृतराव महाजन, दिलीप इंगळे, ज्ञानेश्वर सावळे, संतोष खरे, धनराज डावकर, नितीन पाटील, किशोर कंडारे, प्रल्हाद धारु, संजय कंडारे, तुषार मोरे, राजू कोळी, पांडुरंग कोळी, बापू मराठे, शाम ठाकूर, बापूराव पाटील आदींच्या मुख्य उपस्थितीत निघाला. मोर्चात जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील शिपाई, सफाई व पाणीपुरवठा कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जळगाव जि.प.समोर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 8:01 PM
ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. याचवेळी जि.प.जवळील चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देनियमित पगाराच्या मागणीसाठी घोषणाबाजीपगार देण्यास टाळाटाळ करणाºया ग्रा.पं.चे अनुदान बंद कराराज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे मोर्चा