ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19- एसटी बसमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे भानुदास सपकाळे (रा.धामणगाव, ता.जळगाव) या विद्याथ्र्याला शिवाजी नगर थांब्याजवळ बस थांबवून काही तरुणांनी बेदम मारहाण झाली. त्यामुळे दोन गटात गैरसमजातून अफवा पसरली व त्याचा परिणाम म्हणून शहर पोलीस स्टेशनला तब्बल दोन्ही गटाचा पाचशेच्यावर जमाव एकत्र आला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. दंगा नियंत्रण पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते. तीन तासाच्या मध्यस्थीनंतर रात्री नऊ वाजता हा तणाव निवळला.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव-नांद्रा (क्र.एम.एच.14 बी.टी.1601) ही बस सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता जळगाव स्थानकातून निघाली. आपआपल्या गावाच्या विद्याथ्र्याची जागा सांभाळण्यावरुन नांद्रा व ममुराबाद या गावाच्या विद्याथ्र्यामध्ये वाद झाला. त्याची दोन गटात वाद झाल्याची अफवा पसरली. ही बस शिवाजी नगर थांब्यावर आली असता भानुदास सपकाळे या विद्याथ्र्याला काही तरुणांनी जबर मारहाण केली. जळगावातील तरुणांनी गावातील विद्याथ्र्याला मारहाण केल्याची माहिती धामणगाव, नांद्रा व ममुराबाद येथील लोकांना कळताच तेथील शेकडोच्या संख्येने लोक पोलीस ठाण्यात धडकले, तर आपल्या गटातील मुलींचे नाव घेतल्याची अफवा एका गटाने पसरविल्याने त्याचा परिणाम म्हणून या गटाचेही शेकडो जण धावून आले.चौकशीत झाले गैरसमज दूरतणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. दोन्ही गटाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व मारहाणीत जखमी झालेला विद्यार्थी यांची सांगळे यांनी स्वतंत्ररित्या चौकशी केली असता त्यात नांद्रा व ममुराबाद या दोन गावातील विद्याथ्र्यामध्ये बसमध्ये बसण्यावरुन वाद झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गैरसमज दूर झाल्याने तणाव निवळला.ममुराबाद येथून परत आणली बसशिवाजी नगरात विद्याथ्र्याला मारहाण झाल्यानंतर काही वेळाने वाद निवळला होता. त्यानंतर बस पुढे ममुराबादर्पयत गेल्यानंतर पुन्हा वाद झाला. त्यामुळे बस तेथून तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आली. मारहाणीची घटना शिवाजी नगरात झाल्याने तेथून बस पुन्हा शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आली. बस आल्याने वातावरण अधिक चिघळले. सचिन सांगळे, निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक सारिका कोडापे व एसआयडीच्या अधिकारी पाटील यांनी घटनेची माहिती जाणून घेत दोन्ही गटाच्या लोकांची समजूत घातली. यावेळी स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांनाही बोलावण्यात आले होते.गैरसमज झाल्याने लोकांनी गर्दी केली होती.दोन गावातील विद्याथ्र्याचा बसमध्ये बसण्यावरुन वाद आहे. मारहाण करणा:यांविरुध्द कारवाई केली जाईल.शिवाजी नगरात थांब्याजवळ दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विद्याथ्र्यासाठी स्वतंत्र बस सोडता येईल का? याबाबत अधिका:यांशी चर्चा केली जाईल. -सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक