अमळनेर : तालुक्यात सोमवारी रात्री वादळी पाऊस होऊन पिंपळे येथे गारपीट झाली. यात हाती आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.पिंपळे येथे सुमारे १० मिनिटे गारपीट झाली. यामुळे गव्हाच्या परिपक्व झालेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. दाणे खाली पडून कोंब फुटण्याची शक्यता आहे. तसेच गहू डागी होऊन काळा पडेल. त्याचप्रमाणे बाजरी व मक्याचे पीक जेमतेम उभे राहिले असताना पुन्हा वादळाने व पावसाने झोपले आहे. आधीच पंचनामे झालेले नाहीत. त्यात पुन्हा नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोयगावातही जोरदार पाऊसदरम्यान, सोयगाव तालुक्यातही सोमवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेती उद्योगाचे फार मोठे नुकसान झाले. आज पडलेल्या जोरदार पावसाने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते.
अमळनेर तालुक्यात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 9:38 PM
अमळनेर : तालुक्यात सोमवारी रात्री वादळी पाऊस होऊन पिंपळे येथे गारपीट झाली. यात हाती आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले ...
ठळक मुद्देपिंपळे येथे गारपीटपिकांचे अतोनात नुकसान