शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

कहाणी लॉर्ड्स विजयाची, आक्रमता, धैर्य आणि चिवटपणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:20 AM

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक ...

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व यांच्यामुळे झाला. विशेषत: शेवटच्या दोन सत्रांमध्ये भारताने इंग्लंडला जसे बाद केले तो त्यांच्यासाठी तर अपमानच होता.

भारतीय संघाने दाखवलेल्या धैर्यामुळे खूप काही झाले. जसप्रीत बुमराहने अँडरसनवर बाऊन्सर फेकले. मला वाटते की अकराव्या क्रमांकावरील फलंदाज हा या गोष्टींसाठी तयार नसतो. मात्र बुमराह आणि कोहली हे त्यामुळे गुन्हेगार ठरत नाहीत.

इंग्लंडचे खेळाडूदेखील भारतीय खेळाडूंना नडत होते. त्यामुळे तणाव वाढत होता. शिवाय अँडरसनला फेकलेल्या ८-१० बाऊन्सरच्या बदल्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जवळपास संपूर्ण सत्रच भारताच्या तळाच्या फलंदाजांना तशीच गोलंदाजी केली. मग हेच त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटले.

कशी असेल पुढची मालिका?

लॉर्ड्सवर विजय मिळवताना भारताने गेल्या काही वर्षांत अडचणीच्या ठरलेल्या गोष्टी दूर केल्या आहेत. त्यात सलामीची जोडी आणि सातत्याने संघाच्या विजयात योगदान देणारे गोलंदाज पुढे आलेत.

कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाला त्याची कमतरता भासत होती. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारताला धक्के बसले. कोहली आणि शास्त्री यांनी आक्रमक रणनीती अवलंबली आणि पाच गोलंदाज खेळवले.

दक्षिण आफ्रिका (२०१७), इंग्लंड (२०१८), न्यूझीलंड (२०१९)मध्ये हे बुमरँग ठरले. कारण सलामीवीर अपयशी ठरले आणि तळाचे फलंदाज लवकरच बाद झाले. यावेळी इंग्लंडमध्ये हे कसे असेल.

रोहित शर्मा इंग्लंडमधील स्विंग आणि सीम कंडिशन हाताळू शकेल की नाही, अशी भीती होती. २०१९च्या विश्वचषकात शर्माने विक्रमी पाच शतके केली होती. पण कसोटी क्रिकेट हा एकदिवसीय आणि टी२०पेक्षा वेगळा खेळ आहे.

शर्माने टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजून दोन कसोटींमध्ये त्याने फक्त वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या स्थितीतच नाही तर आक्रमक फटके मारून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. लॉर्ड्सवर शतक पूर्ण न होणे हे दुर्दैवी होते.

सलामीच्या जोडीत सर्वात महत्त्वाची भूमिका ही के.एल. राहुल याची आहे. चौथ्या पसंतीचा सलामीवीर म्हणून त्याने दौऱ्याची सुरुवात केली. शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्या दुखापतींनी दौऱ्यात निवडकर्ते राहुलकडे वळले आणि त्याने या संधीचे सोने केले. सध्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. त्याचे लॉर्ड्सवरील शतक उत्कृष्ठ होते.

भारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलदेखील घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी ही तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली होती. आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला.

न्यूझीलंड विरोधात डब्लुटीसी फायनलसह या दौऱ्यात मधल्या फळीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुजारा आणि रहाणे यांनी शतकी भागीदारी केली, मात्र ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्मपासून अजून दूर आहेत. ऋषभ पंतदेखील अजून चमकलेला नाही.

सर्वात निराश केले ते विराट कोहली याने. त्याने २०१८ मध्ये जवळपास ६०० धावा केल्या होत्या. तेव्हाच्या त्याच्या फॉर्मपेक्षा हे खूप खाली आहे. तो नेतृत्व उत्तम करतो. पण गोलंदाजांची मेहनत आणि मालिकेतील आघाडी वाया जाणार नाही हे मधल्या फळीला बघावे लागेल.