अमळनेर : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट दजार्ची झाली आहेत. अनेक बंधाºयांना पहिल्या पावसातच गळती लागली आहे. सिमेंट बंधाºयांसह बांधबंदिस्ती, खोलीकरण आदी कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील जलयुक्त कामांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या अमळनेर शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केली आहे.याबाबत त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत जुन्या सिमेंट बंधाºयांची दुरुस्ती व खोलीकरणाच्या नावाने फक्त आजूबाजूला मातीचा भराव टाकला आहे. ग्रामस्थांनी काम सुरू असताना संबंधित अधिकारी, ठेकेदारास वारंवार निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले आहे.पिंगळवाडे येथेही असाच प्रकार घडला. सिमेंट बंधाºयाचे ४ लाख ३२ हजार ४८६ रुपये (पहिला टप्पा), २ लाख ५ हजार ३५५ रुपये (दुसरा टप्पा) व ६ लाख ३७ हजार ८४१ रुपये (तिसरा टप्पा) एवढी रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. मात्र, सुरवातीच्या पावसात बंधाºयांना गळती लागून माती वाहून गेली आहे. याबाबत तेथील सरपंचांनी तक्रार केल्यानंतर माती टाकून डागडुजी करण्यात आली. प्रत्यक्षात हे काम देखील थातूरमातूर आणि चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कृषी विभाग होतोय बेदखलजलयुक्त मोहिमेंतर्गत शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र तालुक्यातील अमळगाव, पातोंडा, जानवे, मारवड, मांडळ, मुडी, जवखेडा आदी गावांतील कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. ही जबाबदारी कृषी विभागाची असून अधिकारी, कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.कृषी सहायकांची व्हावी चौकशीअमळनेर येथील अनेक कृषी सहायकांनीच तालुक्यातील जलयुक्तच्या कामांचे ठेके घेतल्याची ओरड शेतकºयांमध्ये आहे. काही कृषी सहायकांनी नातेवाइकांच्या नावाने ठेके घतले. जेसीबी आदी यंत्रांचे आवास्तव बिल कृषी विभागाशी संगनमत करून लाटल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.राज्यातील जलयुक्तच्या कामाबाबत आलेल्या तक्रारींवरून या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करण्यात येईल, असे आदेश विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पावसाळी अधिवेशनात दिले आहेत. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीदेखील सभापतींच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यात सदरील कामांची त्वरित चौकशी करावी. यासंदर्भात जलसंधारणमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. या प्रश्नी आंदोलन उभे करण्याची तयारी आहे. गैरव्यवहार करणाºया ठेकेदार, कृषी सहायक व इतर अधिकाºयांची नावे जनतेसमोर उघड करू, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.