जामनेर, जि. जळगाव : हिवरखेडा दिगर, ता. जामनेर येथे जावई म्हणून वास्तव्यास असलेला हरीश कौतिक कुमावत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
हिवरखेडा येथील पुरुषोत्तम कुमावत यांचा जावई हरीश कुमावत (हिवरखेडा दिगर) हा बांधकाम व्यावसायिक होता व दारूचे व्यसन होते. पत्नीला
रविवारी रात्री वडिलांकडे पाठविले आणि एकटाच घरात होता. सोमवारी सकाळी पत्नी आपल्या घरी गेली असता हरीश दरवाजा उघडत नाही व आवाज दिल्यावरही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून घराचा पत्रा बाजूला करून पाहिले असता हरीश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
गावातील नागरिकांच्या साहाय्याने हरिशला घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी त्यास मृत घोषित केले.