जळगाव : जिल्ह्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आता संचारबंदीसह विशेष निर्बंध १ जून रोजी सकाळी सातपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘त्यात परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे बंधनकारक राहील. त्यासोबतच मालवाहु वाहनांमध्ये फक्त चालक आणि इतर एकालाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यांनी देखील राज्यात दाखल होण्यापुर्वी ४८ तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल बाळगणे बंधनकारक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समित्यांमध्ये भाजी, फळे आणि धान्य यांच्या विक्रीच्या आणि लिलावाच्या वेळा ठरवुन द्याव्यात त्यामुळे एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. दुध संकलन आणि विक्रीला सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सुरू राहील.तसेच २२ एप्रिल आणि ३० एप्रिल रोजीच्या आदेशानुसार लागु करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देण्यात आली आहे.’
जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘त्यात परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे बंधनकारक राहील. त्यासोबतच मालवाहू वाहनांमध्ये फक्त चालक आणि इतर एकालाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यांनीदेखील राज्यात दाखल होण्यापूर्वी ४८ तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल बाळगणे बंधनकारक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समित्यांमध्ये भाजी, फळे आणि धान्य यांच्या विक्रीच्या आणि लिलावाच्या वेळा ठरवून द्याव्यात, त्यामुळे एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. दूध संकलन आणि विक्री सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सुरू राहील. तसेच २२ एप्रिल आणि ३० एप्रिल रोजीच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देण्यात आली आहे.’