जळगाव : अनावश्यक होणारी गर्दी व त्यामुळे वाढणारा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील जळगाव शहर, अमळनेर व भुसावळ या तीन ठिकाणी ७ जुलै ते १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सात दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या लॉकडाऊन संदर्भात शनिवारी दुपारी आदेश काढले़ अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व सेवा या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे़आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील जळगाव शहर महानगर पालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात ७ जुलै सकाळी ५ ते १३ जुलै २०२० च्या रात्री १२०० वाजेपर्यंत हे लॉकडाऊन जाहीर करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे़ याकालावधीत अत्यावश्यक नसलेल्या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे़ या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस विभाग, महानागपालिका जळगाव व नगरपालिका भुसावळ व अमळनेर यांची राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे़आदेशाचा उल्लंघन अथवा भंग गेल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन, साथरोग नियंत्रण कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहिल, असेही सांगण्यात आले आहे़
७ जुलैपासून सात दिवस कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:10 PM