चोपडा : मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास विभागाचे सचिव मा.डॉ. राजेश सोंळकी यांना जिल्ह्यासह तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्यांसंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फ जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, प्रा.जेकराम बारेला, प्रा.जेकराम बारेला, प्रा.संजय भादले यांनी १८ रोजी निवेदन दिले.चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी शासकीय जागा त्वरित मिळावी, जिल्ह्यासह तालुका स्तरावर उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींची यादी त्वरित प्रसिद्ध करून प्रवेश द्यावेत, या शैक्षणिक वर्षाचा निर्वाह भत्ता, डी.बी.टी.रक्कम त्वरित द्यावी, २०१८-१९ या वर्षाची शिष्यवृत्ती मिळावी, संयम योजना बंद करून वसतिगृहांची संख्या वाढवावी, यावल प्रकल्प कार्यालयात वसतिगृहाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुभव कर्मचाºयांची नियुक्ती करावी आदी मागण्या निवेदनात मांडल्या आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी मंत्रालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 9:11 PM