ऑनलाइन लोकमतनागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण : मनपाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावरजळगाव, दि. 6 - जळगाव शहरातील पांझरापोळ भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅँकचा स्लॅब खचल्याने चार जण सहा फूट खोल टाकीमध्ये कोसळून जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने चारही जण बालंबाल वाचले. दरम्यान, या निमित्ताने महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पांझरापोळ चौकात असलेल्या सार्वजनिक शौचालयात सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जोशी पेठ भागातील रहिवासी शौचास गेले असताना शौचालयाच्या प्रवेशव्दार जवळील सेफ्टी टॅँकचा ढापा अचानक खचला यामुळे श्रावण बुधो बारी (वय 75, रा. जोशी पेठ, ), चेतन जगताप (जोशी पेठ), रमेश धुरदेव (जोशी पेठ) व हिरा पाटील (वय 32, दलालवाडा) हे चार जण थेट सहा फूट खोल असलेल्या सेफ्टी टॅँक मध्ये पडले. याचवेळी शौचालयास आलेल्या इतर नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर चारही जणांना शर्थीचे प्रय} करून बाहेर काढले. केवळ हात दिसत होते सहा फूट खोल असलेल्या टाकीमध्ये पडलेल्या नागरिकांचे बचाव करणा:यांना केवळ हात दिसत होते. मदत मिळण्यास उशीर झाला असता तर हा प्रसंग सेफ्टी टॅँकमध्ये पडलेल्या नागरिकांच्या जीवावर बेतला असता. टाकीमध्ये पडलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर ते घरी परतले. नागरिकांना कमरेला व पायावर जखमा झाल्या आहेत. तरुण कुढापा मित्र मंडळाकडून संबधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
धक्कादायक.. सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब खचून चौघे कोसळले टाकीत
By admin | Published: May 06, 2017 1:37 PM