विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२२ : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात सोमवारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरून या कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती, ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. पोलीस अधीक्षकांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र स्थानिक गुन्हा शाखेतील बीट पद्धत काय? आणि नेमकी स्पर्धा कशासाठी हे महत्त्वाचे आहे.१३ बीटद्वारे स्थानिक गुन्हा शाखेची देखरेखसद्या स्थानिक गुन्हा शाखेचे कामकाज हे जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, फैजपूर, यावल, चोपडा, जामनेर, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा या १३ बीटमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक बीटसाठी चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती असते. त्यात साहाय्यक फौजदार किंवा हवालदार दर्जाच्या कर्मचाºयाकडे बीटचे नियंत्रण असते.अधिकाºयाच्या नियुक्ती क्षमता असलेले ‘गब्बर’ कर्मचारीस्थानिक गुन्हा शाखेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा असल्याने याठिकाणी नियुक्तीसाठी मोठी स्पर्धा असते. त्यातच संपूर्ण जिल्ह्याचे कलेक्शन आपल्याकडे रहावे यासाठी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पोलिसातील ‘गब्बर’ कर्मचाऱ्यांकडून अविरत प्रयत्न सुरु असतात. गतकाळात एका कर्मचाऱ्याने एका अधिकाऱ्याच्या पोस्टींगसाठी लागणारी संपूर्ण रक्कम भरल्याची चर्चा आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रत्येक बॅचला असे दोन ते चार गब्बर कर्मचारी हे असतातच. त्यातूनच ‘कलेक्शन’ आपल्याकडे घेण्यावरून असे वाद होत असतात.सोशल क्लब व सट्टा कमाईचे साधनअवैध धंदे सुरु करताना स्थानिक गुन्हा शाखेची मर्जी जोपर्यंत सांभाळली जात नाही तोपर्यंत अवैध धंदे सुरुच होऊ शकत नाही. प्रत्येक बीटमध्ये सर्वाधिक वसुली ही सट्टा व सोशल क्लबच्या माध्यमातून होत असते. त्यात गावठी व देशीविदेशी दारू विक्री, गुटखा तस्करी, अश्लिल सीडी विक्री, गांजा तस्करी, काळ्या बाजारात पेट्रोल व डिझेल विक्रीच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत असते. प्रत्येक बीटचे महिन्याचे कलेक्शन हे दोन ते अडीच लाखांच्या सुमारास आहे.अवैध धंद्यांच्या वसुलीमध्ये हस्तक्षेप नाहीआपल्या बीटमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यावर बीटच्या प्रमुखाचे नियंत्रण असते. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याचे कलेक्शन करणारा कर्मचारी हा शक्यतोवर बीटचा प्रमुख म्हणून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्याचे नाव पुढे करीत असतो. एखाद्या गुन्ह्याचा तपास करीत असताना एकमेकाच्या बीटमध्ये हस्तक्षेप हा होत असताना अवैध धंद्यांच्या माध्यमातून वसुल होणाऱ्या रकमेत मात्र एकमेकांचा हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. असा हस्तक्षेप सुरु झाल्यावरच मग हाणामारी आणि कुरघोड्याचे प्रकार सुरु होत असतात.या बीटमध्ये सर्वाधिक स्पर्धासध्या जळगाव शहर, रावेर, फैजपूर, यावल, जामनेर, एरंडोल व चाळीसगाव या सात बीटसाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. जळगाव शहरात एमआयडीसी भागात सर्वाधिक अवैध धंदे तसेच गुन्ह्यांचे प्रमाण आहे. त्यासोबतच रावेर, फैजपूर व यावल हा केळी पट्टा अवैध धंद्यांच्या दृष्टीने पोषक आहे. जामनेर, एरंडोल व चाळीसगावात सर्वाधिक कमाई आहे. सोमवारच्या घटनेत संबधित कर्मचाºयाचे एरंडोल बीट काढून दुसºया कर्मचाऱ्याकडे दिल्यानेच वाद हाणामारीपर्यंत पोहचला आहे.गटबाजीवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यशस्वीस्थानिक गुन्हा शाखेत नियुक्तीला असलेले कर्मचारी हे सर्वार्थाने अष्टपैलू असतात. याच ठिकाणी जातीपातीचे, कुरघोडीचे, गटबाजीचे वातावरण निर्माण होत असते. कर्मचाऱ्यांवर ज्या अधिकाऱ्याने नियंत्रण ठेवले तो अधिकारी यशस्वी होत असल्याचे उदाहरण आहे. त्यातच नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर कलेक्शनची जबाबदारी आपल्याकडे यावी यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाची ‘फिल्डींग’ सुरु असते. पोलीस कर्मचारी येवले आणि सोनवणे यांच्यातील हाणामारी हा प्रकार तसाच काहीसा आहे.
जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या बीट पद्धतीची अशी आहे रचना
By विलास.बारी | Published: November 22, 2017 6:43 PM
कर्मचाऱ्यांमधील गटबाजीवर नियंत्रण मिळविणारा अधिकारी होतो जळगावात यशस्वी
ठळक मुद्दे१३ बीटद्वारे स्थानिक गुन्हा शाखेची देखरेखअधिकाऱ्यांच्या नियुक्ती क्षमता असलेले ‘गब्बर’ कर्मचारीसोशल क्लब व सट्टा कमाईचे साधनअवैध धंद्यांच्या वसुलीमध्ये हस्तक्षेप नाही