सावदा : पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आल्यानंतर अत्यंत संतप्त झालेल्या महिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या मांडला. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. मतिमंद मुलगीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला शहरातील काही लोक अभय देत आहेत. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावरही अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत सातव यांनी संतप्त महिलांना सांगितले की, आपण या प्रकरणात लक्ष घातले आहे. आरोपीस अटक केली आहे. तो आमच्या पोलीस कोठडीत आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. दरम्यान, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. मानवतेस काळिमा फासणारे कृत्य करणाºया विरुद्ध पोलीस कठोर कारवाई करीत आहे, असे सांगितले. आत्महत्येची घटना घडताच संतप्त जमावाने आरोपी रघुनाथ इंगळे याच्या घरावर धडक दिली. घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपीची पत्नी, मुलगा व इतरांनी मागच्या दाराने पळ काढला.आरोपी इंगळे यांनी या आधी दोन-तीनदा पीडितेवर अत्याचार केल्याची बाब समोर आल्याचे सांगण्यात आले.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सहभाग४आंदोलनप्रसंगी नगराध्यक्ष अनिता येवले, उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, नगरसेविका जयश्री नेहेते, जयश्री कोल्हे, रावेर तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा नेहा गाजरे, माजी नगरसेविका नीलिमा बेंडाळे आदी उपस्थित होत्या.
संतप्त महिलांचा सावदा पोलीस ठाण्यात ठिय्या
By admin | Published: January 18, 2017 12:06 AM