जळगाव- शहरातील महाराष्ट्र स्टुडंटस् युनितयनतर्फे आयोजित विद्यार्थी संवाद व चर्चासत्र कार्यक्रम नुकताच एका हॉटेलात पार पडला़ कार्यक्रमात अन्याय निर्मुलन समितीच्या अध्यक्षा सुचित्रा महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला़ पहिल्या सत्रात मार्गदर्शकांनी ज्युडीशीअल अॅक्टवीसम, विद्यार्थी आणि राजकारण तसेच सध्याची राजकीय परिस्थिती आणि विद्यार्थी चळवळ या विषयांवर मार्गदर्शन केले़ त्यानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या मनातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची चिड आणि विद्यार्थ्यांच्य ाअसलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराबद्दलच्या अपेक्षा जाणून घेतल्या़ या दुसºया सत्रातील चर्चासत्रात अरूण चव्हाण, प्रकाश राठोड, शितल कांबळे, गौरव फुलपगारे, अविनाश तायडे, विकास मोरे, पियुष तोडकर आदींनी सहभाग नोंदविला होता़ कार्यक्रमात युनियनचे संस्थापक अध्यक्ष अॅड़ सिध्दार्थ इंगळे यांनी प्रास्ताविक केले़ तर आभार सुनील देवरे यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव नांगरे, प्रा़ स्रेहा वासनिक, सुनील देवरे, रोहन महाजन, अरूण चव्हाण आदींनी परिश्रम घेतले़
महाराष्ट्र स्टुडंटस् युनियनतर्फे विद्यार्थी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 8:53 PM