जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या रंगतरंगअंतर्गत कला महोत्सवाला सोमवारी विविध कला स्पर्धा आणि प्रदर्शनाने थाटात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी चित्रकला, प्रतिकृती बनवणे, रांगोळी, नाट्यछटा तसेच सुगम गायन, एकल नृत्यातून आपला कलाविष्कार सादर केला. त्यामुळे महोत्सवात रंगत आली होती. दुसरीकडे विविध साकारलेल्या रांगाळ्यांमूधन बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने रंगतरंग कला महोत्सव हा वर्गांमध्ये घेण्यात आला. यात सुरूवातीला चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा प्रत्यक्ष स्वरूपात पार पडल्या. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. चित्रकला स्पर्धेमधे माझ्या स्वप्नातील आधुनिक भारत तसेच कोरोना योद्धा या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटन करत आपलं कल्पनाविश्व साकारले. तर रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ तसेच पर्यावरण वाचवा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी साकारले स्वप्नातील घरइयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी छायाचित्र स्पर्धेमध्ये परिसरातील सौंदर्यतसेच पक्षी निरीक्षण या विषयावर बोलकी चित्र रेखाटल्याचे बघायला मिळाले. त्याचबरोबर प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी काही ऐतिहासिक वास्तूसह स्वप्नातील घराची प्रतिकृती पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीत साकारले होते. यात गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीसह अनेकांनी आपली स्वप्नातली घर तयार केली़ याशिवाय इयत्ता पहिली ते आठवीसाठी चित्रकला, प्रतिकृती बनवणे, रांगोळी, नाट्यछटा, छायाचित्र, सुगम गायन, वक्तृत्व आणि एकल नृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या. तर चित्रकला आणि मॉडेल मेकिंगचे प्रदर्शन कला दालनात भरविण्यात आले. मंगळवारी विविध विषयांवर नाट्यछटा, देशभक्ती गीत, धार्मिक गीत, नृत्य, वकृत्व आदीं स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर स्पर्धा संपल्या नंतर यशस्वी विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जातील तसेच पहिली ते आठवीच्या विजयी विद्यार्थ्यांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना ई -प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.यांनी घेतले परिश्रमशाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील तसेच माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील यांच्या मार्गदर्शनात कला महोत्सवाचे माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रदीप वाघ आणि क्षमा पाटील आणि प्राथमिक विभागाचे प्रमुख जयश्री पाटील तसेच मंजुषा साळुंखे यांच्यासह सर्व कलाशिक्षक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.