जळगाव- मुलांवर होणारे अत्याचार, शोषण, बाल विवाह, बाल मजुरी, भीक मागण्यास भाग पाडणे, पळवून नेणे, शारीरिक अत्याचार, लैंगिक शोषण या वाईट प्रवृत्तींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन बुधवारी विद्यार्थ्यांकडून ला़ना़ विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले़ बालहक्क दिनानिमित्त चाइल्ड लाइनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला़यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केशवस्मृति प्रतिष्ठानचे सचिव व चाइल्ड लाइनचे संचालक रत्नाकर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, चाइल्ड लाइन जिल्हा समन्वयक भानूदास येवलेकर, समुपदेशिका वृशाली जोशी आदींची उपस्थिती होती़कार्यक्रमाच्या सुररूवतीला चाइल्ड लाइनच्या कार्याची माहिती विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली़ त्यानंतर रत्नाकर पाटील यांनी मनोगतात व्यक्त करीत मार्गदर्शन केले़ व अखेर भानूदास येवलेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.पुतळ्याचे केले दहनशाळेच्या प्रांगणात वाईट प्रवृत्तींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ यावेळी विद्यार्थ्यांनी पुतळ्याचे दहन केले़ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल सपकाळ, वसीम तडवी, मनोज कुलकर्णी, आनंद चव्हाण यांनी परिश्रम घेतले. तर सूसंचालन महाजन यांनी केले.