अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या सुमारे ७० ते८० विद्यार्थी स्वयंसेवकांनी स्वच्छता पंधरवडा २०१९च्या पार्श्वभूमीवर अमळनेर रल्वेस्टेशन येथे साफसफाई करून स्वच्छता जागृती विषयक उपक्रम राबविले.अमळनेर रेल्वे स्टेशनचे कर्मचारी मुख्य वाणिज्य निरीक्षक निलेश गुप्ता, एस.आय.पी.एफ रेल्वे सुरक्षा बलाचे नंदकिशोर यादव, मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक अरुण बडगुजर, सफाई मुकादम शिव संगेले, परिवहन निरीक्षक लाल बाबू सिंह यांच्यासह रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नीलेश पवार यांचा स्वच्छता कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेल्वे अधिकारी व महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या देखरेखीखाली विविध उपक्रम राबविले. ट्रॅकवरून विशेषत: प्लॅस्टिकचे पाउच, रॅपर्स, पॉलीबॅग आदी कचरा उचलून साफसफाई केली. स्टेशन आवार स्वच्छ ठेवण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर तसेच स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवर आणि सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वापरण्यासाठी प्रवाशांचे समुपदेशन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.निलेश पवार यांनी मार्गदर्शन केले.