आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१ : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी येथील उर्दू काफिला आणि अलफैज फाऊंडेशनतर्फे जिल्हाभरात शहरांसह खेड्यांपर्यंत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत १ हजाराहून अधिक उर्दू मासिके व वृत्तपत्रांची कात्रणे वाटप केली.हा स्तुत्य उपक्रम सलग ४ दिवस राबविण्यात आला. या उर्दू काफिल्याचे नेतृत्व माजी उपमहापौर करीम सालार, साहित्यिक मुश्ताक करीमी यांनी केले. यात रशीद कासमी, कय्युम असर, आरिफ खान, इफ्तेखार गुलाम रसूूल, ईर्तेकाज साबीर, रशीद खान, जुल्फिकार सय्यद, बशीर खान आदी सहभागी झाले होते.जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथून सुरुवात करीत शेंदुर्णी, जामनेर, नशिराबाद, धरणगाव, एरंडोल, रवंजा, पाचोरा, लोहारा, भडगाव, चाळीसगाव याचबरोबर साकळी, फैजपूर, रावेर, रसलपूर आदी ठिकाणी प्रत्यक्ष जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना वाचनाचे फायदे आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम सांगून उर्दू मासिके तसेच वृत्तपत्रांची कात्रणे वाटप केली. सलग चार दिवस भर उन्हातान्हात फिरुन हे कार्य करण्यात आले हे विशेष.काफिल्याच्या या दौऱ्यात ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मासिके वाटप करण्यात आली. यावेळी एक बाब उपक्रम राबविणाºयांना जाणवली की, अनेक घरांमध्ये मासिके आणि वृत्तपत्रेच येत नसल्याने लहान मुले सोशल मीडिचाच अधिक वापर करीत आहे. यास पालकांचा दुर्लक्षितपणाही जबाबदार आहे. लहान मुले व मुलींनी मासिके आणि वृत्तपत्रांचे कात्रणे खूप आतुरतेने स्विकारले आणि जागेवरच वाचन सुरु केले.
जळगावातील विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये लावली वाचनाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 3:38 PM
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी येथील उर्दू काफिला आणि अलफैज फाऊंडेशनतर्फे जिल्हाभरात शहरांसह खेड्यांपर्यंत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत १ हजाराहून अधिक उर्दू मासिके व वृत्तपत्रांची कात्रणे वाटप केली.
ठळक मुद्देसलग ४ दिवस जिल्हाभर संपर्कविद्यार्थ्यांना १ हजार मासिकांचे वाटपसोशल मीडियाचा वापर आढळला अधिक