आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ११ - रक्तक्षय व कुपोषण होण्याची शक्यता असलेल्या कृमी दोषावर मात करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम हाती घेण्यात आली असून यामाध्यमातून जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील १२ लाख २७ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. २८३८ शाळा व ३८५३ अंगणवाड्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया या मोहिमेचे तरसोद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते उद्््घाटन झाले.११ ते १४ या वयोगटातील मुलांमध्ये कृमी दोष आढळतो. यामुळे बालकांची एकंदरीत बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि बालकल्याण विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्ह्यस्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहहिमेच्या उद््घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पंचायत समितीच्या सभापती यमुनाबाई रोटे, गटविकास अधिकारी सोनवणे, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रवीकिरण बिºहाडे, फिरोज पठाण, बी.डी.धाडी, सरला पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ््यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांना १५ फेब्रुवारी रोजी गोळ््यांचे वितरण करण्यात येणार आहे.प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे महत्त्व विषद केले. जंतनाशकाची गोळी दिल्यानंतर मळमळ, पोटदुखी, अतिसार झाल्यास १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सरपंच अर्चना पाटील व गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा सानप यांनी स्वागत केले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ, चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे उद्घाटनदेखील करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत मुलीच्या जन्माचे स्वागतानित्ताने सुनिता ओमप्रकाश खुशवा यांचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे, शौचालयावरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, अशा चांगल्या सवयी बालपणात रुजवून वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पोटात जंताची वाढ झाल्याने बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊन त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. तसेच मुलांचे कुपोषण टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या मुलांनी खाल्या पाहिजेत. तसेच मुलांच्या आहारात सर्व जीवनसत्त्वे आवश्यक असून याकडे पालकांनीदेखील लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर खोंडे यांनी केले.दरम्यान, मुलांमधील आजार टाळण्यासाठी या मोहिमेंतर्गत देण्यात येणाºया या गोळ््यांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील १२ लाख २७ हजार विद्यार्थ्यांची होणार कृमी दोषापासून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:49 PM
१ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लाभ
ठळक मुद्दे२८३८ शाळा व ३८५३ अंगणवाड्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमजिल्ह्यस्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहीम