ऑनलाईन लोकमत धरणगाव, जि. जळगाव, दि. 31 : तालुक्यातील साकरे, साळवा व अनोरे विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विज्ञान विषयावर नाटिका सादर केल्या. त्यात प्रामुख्याने नदीची स्वच्छता, डिजिटल इंडिया व स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयांवर नाटिका सादर करून चांगला संदेश दिला तालुक्यातील साकरे, साळवा व अनोरे विद्यालयातील विद्याथ्र्यानी विज्ञान नाटय़ स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात साकरे व साळवा विद्यालयास संयुक्त विजेता घोषित करण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक अनोरे विद्यालयाला देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बि:हाडे, तालुका समन्वयक बी.आर. महाजन उपस्थित होते. समारोपप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बि:हाडे यांनी विजेते घोषित केले. परीक्षण ए.पी.चौधरी, दीपक चौधरी यांनी केले. विज्ञान समन्वयक बी.आर. महाजन यांनी आभार मानले.
विज्ञान नाटय़ स्पर्धेतून विद्याथ्र्यानी दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:38 AM
धरणगाव येथे आयोजित स्पर्धेत साकरे व साळवा विद्यालय ठरले संयुक्त विजेते
ठळक मुद्देविविध शाळांतील विद्याथ्र्यानी विज्ञानावर आधारित विविध विषयांवर नाटिका सादर केल्या.साकरे विद्यालय व साळवा विद्यालयास विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला, तर द्वितीय क्रमांक अनेारे विद्यालयाचा आला.विद्याथ्र्यानी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद