धुळे : विद्याथ्र्यासोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयावर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बहिष्कार करण्यात आला आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना निवेदन देण्यात आले.3 नोव्हेंबर 2016 रोजी सेल्फी काढण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2017 पासून करण्याचे सुचविले आहे. जानेवारी 2017 पासून दर सोमवारी वर्गातील विद्याथ्र्याचा ‘सेल्फी’ काढून ‘सरल’वर पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षकांना अगोदरच शाळांची एम.डी.एम, सरल, शिष्यवृत्ती, आधार कार्ड माहिती यासारखी शाळांची माहिती ऑनलाइन भरली जाते. राज्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. मोबाइलची रेंज नाही. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. शिवाय अध्यापनाचा वेळ वाया जात आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. यापूर्वीच शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न निर्णयाशिवाय प्रलंबित आहे. त्यातच ऑनलाइन व ‘सेल्फी’च्या निर्णयांमुळे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरणे व सेल्फी काढण्याचा फेरविचारावर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. अन्यथा संघटना या निर्णयावर बहिष्कार टाकत आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, रवींद्र खैरनार, देवीदास महाले, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, अकिल धोबी, राजेंद्र भामरे, गमन पाटील, नानासाहेब बोरसे, विश्वनाथ सोमवंशी, बापू पारधी, भूपेश वाघ, रामराव पाटील, विजय खैरनार, आनंद पाटील, सतीश शिंदे, हनुमंत बैरागी, शरद भामरे उपस्थित होते.
विद्याथ्र्याच्या ‘सेल्फी’ला शिक्षकांचा विरोध
By admin | Published: January 08, 2017 12:08 AM