जळगाव : कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीने परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घरूनच परीक्षा देण्याची मुभा दिली असली तरी आपल्या मित्रांसमवेत परीक्षा देण्याची मजाच काही और असते. असे म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र जमून परीक्षा दिली तर काहींनी चौकातला कट्टा, घराच्या पार्किंगसह छतावर बसून ऑनलाईन परीक्षा पार पाडली.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात सूचना तसेच वेळापत्रक जाहीर केले होते. जळगाव जिल्हयातून सुमारे तीन ते चार हजाराच्यावर विद़यार्थी डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत. मंगळवारपासून पॉलिटेक्निकच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी बॅकलॉक विषयाचे पेपर झाला. बुधवारी रेग्यूलर विषयांच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. ही परीक्षा सकाळ व दुपार अश्या दोन सत्रात घेण्यात येत आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत ही परीक्षा विद्यार्थी देत आहेत.यंदा आमचा हा वेगळाच अनुभव...परीक्षेसाठी विद्यार्थी चौकातील कट्टयावर जमले होते तर काही ठिकाणी चहाचा आस्वाद घेत परीक्षा देतानाचे चित्र होते. आम्हाला कधी वाटलंही नाही, अशा पध्दतीने आम्ही परीक्षा देउ शकतो. परीक्षा ही फक्त वर्गातच बसून देता येते आम्हाला वाटत होते. पण यंदा आमचा हा वेगळाच अनुभव आम्हाला मिळाला, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.अविस्करणीय परीक्षा राहिल असे, मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी घरातचं थांबून तर काहींनी आपल्या घराच्या छतावर बसून परीक्षा दिली.प्राध्यापकांनी सोडविल्या अडचणी....ऑनलाईन पेपर सोडवित असताना काही विद़यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, विद़यार्थ्यांनी लागलीच प्राध्यापकांशी संपर्क साधून ती अडचण सोडवून घेत परीक्षा दिली.