शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचवण्याचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 3:45 PM

भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजनजागृती अभियानगावभर प्रभातफेरीवृक्ष लागवड करा, त्याचे संवर्धन करासांडपाण्याचा निचरा कराशौषखड्डे करापर्यावरण वाचवा

मुक्ताईनगर, जि. जळगाव : भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाणी बचतीचा कृतीद्वारा संदेश आत्मसात करीत आहेत. अशा या उपक्रमाचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात २०१६ साली ७१३ मिलिमीटर २०१७ साली ५३७ किलोमीटर, तर २०१८ साली ३५७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. यावरून झपाट्याने म्हणजेच दरवर्षी २०० मिलिमीटर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. इतकेच नव्हे तर भूजल पातळीत दर सहा महिन्यांनी दहा ते साडेदहा फूट घट होत आहे. हा जलसंकटचा इशारा असून, तरीही जनता जागृत झाली नाही तर वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी वृक्ष लागवड करणे, पाण्याचा अपव्यय थांबवणे, सांडपाण्याचा निचरा शोषखड्ड््यात करणे असे विविध उपाय सर्वांनी करावे. कारण पाणी तयार करता येत नाही. त्यामुळे सजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर पाणी वाचवणे, वृक्ष वाचवणे, पर्यावरण वाचवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्था व सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून व आयोजनातून देण्यात येत आहे. याबाबत १ मे महाराष्ट्र दिनापासून ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभिनव उपक्रम सतत चार-पाच दिवस सुरू आहे. उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात येत असल्याचेही आयोजकांचे म्हणणे आहे. ही संकल्पना संस्थेचे सचिव डॉ.दिलीप पानपाटील यांनी सुचवल्यामुळे सुकळी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, शिक्षक दत्तात्रय फेगडे, शरद बोदडे, शरद चौधरी, वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नवल कोळी, सतीश सोनवणे, अनिल चौधरी हे नागरिकांच्या प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचून भेटी घेत आहेत. नागरिकांना पाण्याचे महत्त्व व बचत याबाबत मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे येणारे जलसंकट किती भयावह आहे याचीही जाणीव करून देत आहेत. या अभियानाची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील वायला या गावापासून करण्यात आली आहे. त्यानंतर महालखेडा, टाकळी, नांदवेल, डोलारखेडा, सुकळी, सोमनगाव आणि दुई अशा गावांमध्ये संदेश पोहोचविण्यात येत आहे.वायला येथे पोलीस पाटील सुनील तायडे, बाजीराव कोळी यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला.नांदवेल येथे जि. प. सदस्य नीलेश पाटील यांनी सपत्नीक या अभियानात सहभाग नोंदवला. तसेच पोलीस पाटील अनिल वाघ, मुरलीधर पाटील, गजानन सुरवाडे, नंदू वाघ, दीपक वाघ, जि.प. शिक्षक हिरोळे यांनीही सहभागी होऊन जलबचतीचा संदेश दिला.महालखेडा येथे पोलीस पाटील राजू वाघ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच तसेच सेवानिवृत्त शिक्षक गुणवंतराव वाघ यांनी सहभाग नोंदवला. टाकळी येथे संस्थेचे संचालक रसाल चव्हाण यांनीही सहभाग घेतला.सुकळी सोमनगाव येथे सरपंच शकांताबाई पाटील तसेच पंचायत समिती सदस्य विकास समाधान पाटील, पोलीस पाटील संदीप इंगळे, कडू महाराज, विनोद डापके, भाऊलाल पाटील, माजी सरपंच बाजीराव सोनवणे, ग्रामपंचायतच्या माजी सदस्या सुनीता कोळी, माजी सरपंच भगवान धनगर, देवानंद चव्हाण, वामन कोळी, रघुनाथ कोळी, दादाराव नामदेव पाटील, प्रफुल्ल पाटील, वीरेंद्र पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गाजरे यांनीही सहकार्य केले.दुबई येथे वसंत तळेले सरपंच संदीप जावळे, माजी सरपंच जुलाल पाटील, राजेंद्र पाटील, मुरलीधर फेगडे यांच्यासह सुकळी येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक ई.ओ.पाटील यांनीही अभियानात सहभाग नोंदवला.डोलारखेडा येथे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ सुरेश इंगळे, विनोद इंगळे, माजी सरपंच पुंडलिक वालखड, ग्रामपंचायत सदस्य माणिक बिल्डर, सोनार तसेच समाधान थाटे, मारुती कोळी यांनीही सहकार्य केले. सदरचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आला.यावर्षी कुमारी रूपाली इंगळे या विद्यार्थिनीच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीMuktainagarमुक्ताईनगर