ऑनलाईन लोकमत
अडावद, जि. जळगाव, दि. 6 - मुक्कामी बस न आल्याने चोपडा तालुक्यातील अडावद येथे शाळेत परीक्षेसाठी येणा:या पिंप्री , कमळगाव, चांदसणी व रुखणखेडा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पायपीट करीत करावी लागली. परीक्षा असल्याने पिंप्री येथील सरपंच संजय इंगळे यांनी मुलींना पोहचविण्यासाठी ट्रॅक्टर पाठविले व त्याद्वारे मुलींना शाळेत सोडले. अनेक विद्याथ्र्याना पायपीट करीतच शाळा गाठावी लागली. राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अडावद बसस्थानक परिसरात विद्याथ्र्यांचे रास्तारोका आंदोलनपरीक्षा संपल्यानंतर विद्याथ्र्यानी अडावद बसस्थानकामध्ये रस्ता रोको आंदोलन केले. तेथे त्यांनी कायमस्वरुपी बस मिळण्याती मागणी केली. त्यानंतर 70 ते 80 विद्यार्थी पोलीस ठाण्यात पोहचले.