जळगाव : अक्सा मशिदीत झालेल्या सिमीच्या बैठकांचे 10 अर्ज गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच शेख फारुक शेख अब्दुल्ला यांनी दिलेली साक्ष व जबाब न्यायालयात वाचून दाखविण्यात आला.अक्सा मशिदीच्या अध्यक्षाचे निधन झाल्याने त्यांचा पदभार सचिव फारुख शेख याच्याकडे सोपविण्यात आला होता. त्याच्या उपस्थितीत इस्तेमाची बैठक घेण्यात आली. सिमीच्या लेटरहेडवर बैठकांचे दहा अर्ज देण्यात आले होते. हे सर्व अर्ज न्यायालयात सादर करण्यात आले. यातील काही अर्ज फारुक शेख यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवले तर काहींना परस्पर परवानगी दिली. दरम्यान, या खटल्यातील साक्षीदारांचे जबाब, डायरी, आरक्षण पावती, तक्ता आदी वस्तूही न्यायालयात आणण्यात आल्या होत्या. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.
सिमीच्या बैठकांचे 10 अर्ज सादर
By admin | Published: January 13, 2017 12:41 AM