रावेर/ब:हाणपूर : सिंहाप्रमाणे पौराणिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या ब:हाणपूर शहराच्या उज्जवल भविष्यासाठी सिंहावलोकनातून देशभरातील ख्यातनाम विद्यापीठांकडून शहरातील वारस्याचे संशोधन व शोधप्रबंध सादर करून जागतिक वारसाचे नामांकन आगामी जागतिक वारसा दिनापयर्ंत केल्याशिवाय राहणार नाही असा दृढविश्वास महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस यांनी येथे शोध चर्चासत्राचे उद्घाटन समारंभात केले. जागतिक वारसा दिनानिमीत्त आयोजित ब:हाणपूर सिंहावलोकन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर अनिल भोसले होते.
शाही किल्ल्यावरून व विद्यार्थी- विद्यार्थिनी व पर्यटनप्रेमी जनतेच्या दोन गटांना त्यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून ‘हेरिटेज वॉक’चे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक सिंह, महापौर अनिल भोसले, होशंग हवालदार, डॉ. मेजर महेशचंद्र गुप्ता उपस्थित होते.
(वार्ताहर)