प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : प्रेमाचा अर्थ काढणे ज्याचा त्याच्या विचारांवर अवलंबून आहे, पण वयाची ८० वर्षे उलटल्यानंतरदेखील आंधळ्या बायकोची आयुष्यभर सेवा करणारा पती कसा अर्थ काढणार, याचा विचार आजचे विशी-तिशीतले तरुण करू शकतील का? पण हे वास्तव आहे एरंडोल तालुक्यातील जळू गावाजवळील चंदनपुरी गावातील. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने १४ फेब्रवारी या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विशेष पुरवणीत ठळकपणे प्रसिद्ध केले होते.हे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक सहृदयी नागरिकांनी गुरुवारी या पतीपत्नीची भेट घेऊन आपापल्या परीने मदत केली आहे. कुणी कपडे-साडी नेली, तर कुणी संसारोपयोगी वस्तू भेट केल्या, तर कुणी घरात लाईट नसल्याने सोलर बल्प दिले. अचानकपणे मदतीचा ओघ घरबसल्याच झाल्याने हे वृद्ध जोडपे भावूक झाले. क्षणार्धात डोळ्यातून घळाघळा धारा वाहू लागल्या. एवढे दारिद्र्य घरात असल्यावरदेखील एवढे कशाला आणले मायबाप हो असे करुणामय शब्द आंधळ्या वृद्धेने रडतरडत काढले.चंदनपुरीत दुलसिंग गिरधर भिल (वय ७८) हे सिंधूबाई (वय ७०) या पत्नीसह राहतात. लग्नाला ५०-५५ वर्षे झाली असावीत, पण त्यांच्या संसाररुपी वेलीला फुलं काही लागली नाहीत. लग्नानंतर काही वर्षांनी सिंधूबाईचे अर्धे डोकं अचानक दुखू लागले. डॉक्टरकडे नेल्यानंतर दीड हजार रुपये खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. पण तेवढेदेखील पैसे नसल्याने इलाज राहिला. काही दिवसात डोळ्यांनी दिसणेच बंद झाले, ते आज तागायत. त्यानंतर सहचारिणीच्या सेवेचा वसा सुरू झाला तो निरंतर सुरुच आहे. घर तूरकाठीच्या काड्यांचे. अठराविश्व दारिद्र्य. वय साथ देत नाही, तरी अंध म्हातारी करपू न देता भाकरी भाजते. वृद्ध वृद्धेला घास भरवतो, असा संसाराचा गाडा सुरू आहे. शेजारीपाजारी हल्ली आपल्या जेवणातले काही आणून देतात. सरकारकडून एकाचे सहाशे असे दोघांचे बाराशे मिळतात. त्यात कशीबशी गुजराण होते. पुतण्या मदतीला येतो. पण या वयात दोघांना एकमेकांचा सहारा हाच त्यांचा समाधानाचा विषय. त्यातच ९५ ते १०० वयाची या वृद्ध आईचीही जबाबदारी याच दुलसिंग भिल यांना ओढावी लागत आहे.या भयानक गरिबीचे वास्तव ‘लोकमत’ने ठळकपणे मांडले. यानंतर कासोद्यातून भास्कर चौधरी यांनी दोघांना कपडे घेतले. शर्टपँट तातडीने शिवून घेतले. घरात उजेड व्हावा म्हणून उमेश नवाल यांनी सोलरचा बल्प दिला. रामराव ठाकरे यांनी किराणा सामानाच्या वस्तू दिल्या. समाधान चौधरी यांनी तांदूळ व गहू दिले. पुनेश मंत्री व संजय चौधरी यांनी चना दाळीची पाकिटे दिली. केशव सोनार यांनी रोख हजार रुपयांसह खाण्या-पिण्याच्या वस्तू दिल्या. जळगावहून अखलाख अहमद यांनी रोख एक हजार रुपये पाठवले.एवढी सारी अचानक भरघोस मदत घरी बसल्या न मागता आल्यावर या कुटुंंबाला जणू आश्चर्याचा सुखद धक्का बसला व आनंदाश्रू कधी गळू लागले हे कुणालाच कळले नाही. मदत करणारे पण अतिशय भावनाविवश झाल्याचे यावेळीचे चित्र गावकऱ्यांनी अनुभवले.
सहृदयी नागरिकांचा चंदनपुरीत मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:45 PM
प्रेमाचा अर्थ काढणे ज्याचा त्याच्या विचारांवर अवलंबून आहे, पण वयाची ८० वर्षे उलटल्यानंतरदेखील आंधळ्या बायकोची आयुष्यभर सेवा करणारा पती कसा अर्थ काढणार, याचा विचार आजचे विशी-तिशीतले तरुण करू शकतील का? पण हे वास्तव आहे एरंडोल तालुक्यातील जळू गावाजवळील चंदनपुरी गावातील. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने १४ फेब्रवारी या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विशेष पुरवणीत ठळकपणे प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक सहृदयी नागरिकांनी गुरुवारी या पतीपत्नीची भेट घेऊन आपापल्या परीने मदत केली आहे.
ठळक मुद्देवृद्ध दाम्पत्य झाले भावनाविवश‘लोकमत’मधील वृत्ताचे शिक्षकाने पेढे वाटून केले स्वागतमदतीसाठी सरसावले...