जळगाव : उस्मानाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट आयएमए महास्पोर्ट्स मध्ये जळगाव आयएमएने विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले. त्यात कॅरममध्ये डॉ. अनघा चोपडे यांनी महिला दुहेरीत सुवर्ण पदक मिळवले तर महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळवले. बॅडमिंटनमध्ये डॉ. वृषाली पाटील यांनी महिला दुहेरीत खुल्या गटात सुवर्ण पदक पटकावले तर महिला एकेरी रौप्य आणि मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली. पुरूष बॅडमिंटनमध्ये डॉ. संदीप पाटील आणि डॉ. समीर चौधरी यांनी पुरूष दुहेरीत उपांत्य फेरीत मजल मारली.
आयएमए जळगाव क्रिकेट संघाने साखळी सामन्यात मुंबई, अमरावती, सातारा या संघांना पराभूत केले. मात्र उपांत्य फेरीत अमरावती स्टारकडून पराभव पत्करावा लागला. डॉ. विनोद पवार यांनी सर्वाधिक १६४ धावा केल्या. त्यांना मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
क्रिकेट संघामध्ये डॉ.पंकज गुजर, डॉ.माजिद खान, दिलीप महाजन, डॉ. सुशील राणे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. मनीष चौधरी, दीपक जाधव, डॉ. पराग नहाटा, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. जितेंद्र नारखेडे, डॉ. जितेंद्र कोल्हे यांचा समावेश होता. सर्व खेळाडूंचे कौतुक सचिव डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ दीपक पाटील, आणि आयएमए जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.